pm awas yojna new update:
Pradhan Mantri Awas Yojna-Gramin (PMAY-G) ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील गरीब आणि दुर्बल वर्गाला स्वत:चे घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. ही योजना २०१६ मध्ये सुरू करण्यात आली आणि ती “सर्वांसाठी घर” या संकल्पनेवर आधारित आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांसाठी ही योजना खूप महत्त्वाची ठरली आहे, कारण यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य मिळून स्वत:चे घर बांधणे शक्य होते. भारत सरकार नागरिकांसाठी विविध योजना राबवत आहे, ज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश गरीब आणि गरजू नागरिकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत प्रदान करणे आहे. या संदर्भात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
१० लाख घरांची मान्यता…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ग्रामविकास विभाग ने उत्कृष्ट कामगिरी केली आहे, आणि केंद्राकडून अजून 10 लाख घरांना मंजुरी मिळाली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर, संबंधित कुटुंबांना घरासाठी आवश्यक जमिनीची उपलब्धता करण्यासाठी मोहीम सुरू केली जाईल. यामुळे एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
प्रत्येक घरांवर सोलर पॅनल बसवण्यासाठीचा निधी मंजूर…
मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबरोबरच आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर झालेल्या घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याचा निधी मंजूर झालेला आहे . यामुळे घरांना उर्जेवर आधारित विजेची सुविधा मिळेल. या योजनेद्वारे गरीब आणि गरजू लोकांना विविध प्रकारच्या संधी निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या घोषणांमुळे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत राज्यातील बेघर व्यक्तींना सुरक्षित आणि सुविधा युक्त घर मिळविण्याची मोठी संधी मिळणार आहे. यामुळे राज्याचे भविष्यात एक बेघरमुक्त राज्य बनण्याचे स्वप्न साकार होईल.
Pradhan Mantri Awas Yojna-Gramin अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया आहेत..
१. ऑनलाइन अर्ज
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण साठी अर्ज करण्यासाठी अर्जदारांनी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी येथे click करा (https://pmay-urban.gov.in)
२. ऑफलाइन अर्ज
अर्जदार त्यांच्या जिल्हा प्रशासकीय कार्यालयात जाऊन देखील अर्ज करू शकतात.
३. आवश्यक कागदपत्रे
– आधार कार्ड
– रेशन कार्ड
– मतदान ओळखपत्र
– बँक खाते तपशील
– आईडिप्रूफ