
Ration Card Facial E-kyc
Ration Card Facial E- kyc- सर्व राशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी आहे. आता घर बसल्या सहज आपल्या राशन कार्ड E – kyc आपल्या मोबाईलद्वारे करता येणार आहे. आता केवायसी करण्यासाठी आपली धान्य वितरण दुकान मध्ये जाण्याची आवशकता नाही. सरकारी अन्न व ग्राहक संरक्षण विभागाने फेशिअल ई-केवायसी साठी मेरा ई-केवायसी (Mera E – kyc ) नावाने अँप बनवले आहे. हे अँप गुगल प्ले स्टोरला उपलब्ध आहे.
Ration Card Facial E- kyc- ई-केवायसी मुळे सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो. ई-केवायसी साठी बायोमेट्रिक आणि आयरिस स्कॅन होणे आवश्यक आहे. परंतु, लहान मुलांना व वयोवृद्ध व्यक्तींना आपले बायोमेट्रिक आणि आयरिस स्कॅन करण्यासाठी नेहमीच अडचणी येतात. तर ह्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारने आता डायरेक्ट फेशिअल ई-केवायसी करण्यासाठी हा अँप लॉन्च केला आहे. जेणे करून ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार घरबसल्या आपली मोबाईल द्वारे ई-केवायसी करणे सोप्प होईल.
Ration Card Facial E- kyc साठी अंतिम तारीख- सरकारने आतापर्यंत दोनवेळा मुदतवाढ दिली होती. हि मुदत आता मार्च २०२५ च्या अखेर पर्यंत वाढवण्यात आली आहे. सर्व लाभार्थ्यांना मुदत संपण्याच्या आत आपले ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.
Ration Card Facial E- kyc कश्याप्रकारे करायची –
- गुगल प्लेस्टोर उघड त्यामधून मेरा ई-केवायसी (Mera E -Kyc ) अँप डाउनलोड करा.
- अँप उघडल्या नंतर राज्याचा पर्याय निवाडा आणि महाराष्ट्र राज्य सेलेक्ट करा.
- आपला आधार क्रमांक टाका व OTP जनरेट करा.
- रजिस्टर मोबाईल नंबर वर आलेला ओटप प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
- स्क्रीन वर दिसणाऱ्या माहितीची पडताळणी करा व एक्सेप्ट बटन दाबा.
- फेशिअल ई-केवायसी ओपशन सिलेक्ट करा.
- सेल्फी कॅमेरा उघडल्या वर आपले डोळे बंद-चालू करून चेहऱ्याचा फोटो कॅप्चर करा.
- तुमची ई-केवायसी पूर्ण होईल आणि डिजिटल रिसीट प्राप्त होईल.
राज्यभर ई-केवायसी करण्यासाठी पोस्टर, बॅनर आणि घरोघरी जाऊन जनजागृती करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच धान्य वितरण केंद्रांनाही लाभार्थ्यांना सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
- ई-केवायसी पूर्णपणे मोफत आहे.
- आपला मोबाईल नंबर आधारकार्डशी लिंकअसणे आवश्यक आहे.
- मार्च २०२५ च्या आत सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे.
- रेशनकार्ड धारकांनी त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करावी आणि घरबसल्या सोयीचा लाभ घ्यावा..







